आज सगळीकडे आरोग्याबाबत जागरूकता वाढत चालली आहे. म्हणूनच फिटनेसच्या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. फिटनेस ट्रेनर म्हणून काम करताना उत्पन्न आणि उत्तम आरोग्याचा लाभ होतो. या क्षेत्रातील संधींचा वेध. अथलेटिक ट्रेनर, फिजिकल थेरपिस्ट, मसाज थेरपस्ट, फिटनेस इन्स्ट्रक्टर, ट्रेनर अशा अनेक भूमिका पार पाडता येतात. * खेळ, शारीरिक हालचाल आणि एकंदरितच फिटनेसची आवड असेल तर या क्षेत्रात यायला हरकत नाही. एरोबिक इन्स्ट्रक्टर, क्लिनिकल एक्सरसाईज स्पेशालिस्ट, जीम इन्स्ट्रक्टर, पर्सनल आणि कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून तुम्ही काम करू शकता. * व्यक्तीचे वय, जीवनशैली, आरोग्य या गोष्टी लक्षात घेऊन व्यायाम प्रकारांची निवड करणे हे फिटनेस ट्रेनरचे कौशल्य असते. तसेच आरोग्य आणि पोषक आहाराविषयीही फिटनेट ट्रेनर सल्ला देतो. * फिटनेस ट्रेनर ठराविक व्यायामप्रकारात नैपुण्यही मिळवू शकतात. * फिटनेस ट्रेनर म्हणून जीम, एरोबिक्स सेंटर्स, स्पा अशा विविध ठिकाणी नोकरी करता येते. अनुभव मिळाल्यानंतर स्वत:चे फिटनेस सेंटर उघडता येतं. सेलिब्रिटी किंवा इतरांचे फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम करता येतं. * कौशल्यासोबतच शैक्षणिक गुणवत्ता असणे आजच्या काळात गरजेचे मानले गेलेय. त्यामुळे योग, स्पोर्टस सायन्स, फिटनेस, नॅचरोपॅथी या विषयांमध्ये पदविका किंवा पदवी मिळवता येऊ शकते. एखाद्या नावाजलेल्या जीममधूनही तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. द स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया, लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल फिटनेस यासारख्या संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
फिटनेसचा मंत्र जपा!